https://www.facebook.com/KaviVidyanuj
धोक्याचा इशारा -
कविता वाचून तुम्हाला हसू आणि आसू आल्यास, जुन्या आठवणी जाग्या झाल्यास कवी जबाबदार राहणार नाही.
हे पेज माझ्या स्वतःच्या कविता आणि आवडलेल्या काही खास कवितांचा संग्रह करण्यासाठी बनवले आहे.
कवितांचा उद्देश केवळ निखळ आनंद वाटणे, मार्मिक भाषेत सत्य मांडणे, वास्तवाचे भान ठेवून दिशादर्शक, प्रेरणादायक लिखाण करून आपली संवेदनशीलता टिकवून ठेवणे इतकाच आहे.
Sunday, 10 January 2016
Ek Kavi Hava
Dedicated to Sandip Khare ji and Vaibhav Joshi ji.
एक कवी हवा
ReplyDelete(आजच्या पिढीला कवितेची आवड पुन्हा निर्माण करणारे संदीप, सलील, वैभव यांना उद्देशून लिहिलेल्या काही ओळी)
मनाला हात घालून, थेट शब्दात मांडणारा,
भीडभाड न बाळगता, जगणं काय सांगणारा ।।
प्रेमाची किमया कळून, वासनांचे मळभ आटावेत,
इतके सारे शहाणपण, एका ओळीत साठावे ।।
एकेका कवितेमागे, एकेक नाते उलगडावे,
हक्क आपल्यावर साऱ्यांचा, महत्व प्रेयसीलाच का द्यावे ।।
चिंब पाऊस, थंड वारा, शीतल चंद्र, उनाड वारा,
टाळून बुद्धीचा अंकुश, न्याहाळावा निसर्ग सारा ।।
रचावी गमतीशीर, हलकी फुलकी बडबड गीते,
बाळ ऐकावे कुणालाही, सहज म्हणता येते ।।
स्वतंत्र नसतो माणूस,तो सामाजिक प्राणी,
देश, धर्म, संस्कृतीशी, जोडणारी हवीत गाणी ।।
बरे वाईट सारे, सहजतेने सांगणारी,
कविता हवी, मार्मिकतेने मांडणारी ।।
मिश्किल विनोद, कठोर प्रहार, शब्दांचा खेळ,
मनातून आलेली उत्तरे, यमकांचा मेळ ।।
विना अवजड शब्द, सोपे,सुटसुटीत,
द्यावे समाजाला साहित्य, खमंग खुसखुशीत ।।
काट्यावर पळणारे आम्ही, व्यवहारी गंभीर,
कवी दिसे वेगळा, भावनांशी प्रामाणिक, खंबीर।।
काव्याने येई, जगण्यात जिवंतपणा,
धैर्य देई ते, जगण्या पुढच्या क्षणा, जगण्या पुढच्या क्षणा ।।
- कवी विद्यानुज उर्फ कवी योगेश