Sunday, 29 September 2013

अंतरीच्या वेदना, कविता बनून भेटल्या,
यमकांच्या शृंगाराने, मनमोहक भासल्या,
हसलो,रडलो,चिडलो,त्यांना कडकडून भेटलो,
स्वतःशी का होईना, मनमोकळे बोललो
- कवी विद्यानुज
झिडकारून रक्ताचा गर्व, गीते नवी रचू पाहतो,
नाकारून भेदभाव सर्व, वाट नवी बनवू पाहतो,
दिखावू मानापमानाच्या, चिंता हव्या कशाला,
माणसांना माणसांपासून, तोडणाऱ्या परंपरा जपाव्या कशाला
- कवी विद्यानुज
कोणाचा दोष नव्हता कधी, अपघात होत राहिले,
पूर्व कल्पना असो वा नसो, आघात होत राहिले,
आले गेली माणसे, घर आबाद बरबाद होत राहिले,
साऱ्या आठवणी घेवून, जीवन पुढे जात राहिले
- कवी विद्यानुज
स्वतःच्या आयुष्याला, स्वतःपुरते मानू नये,
त्रास देणाऱ्या विषयांना, त्रास होण्याइतके ताणू नये,
क्षणभंगुर जीवनात, सारी दुःखे क्षुल्लक आहेत,
साऱ्यांना पुरून ऊरू, जोवर आपल्यांचे प्रेम शिल्लक आहे
- कवी विद्यानुज

Sunday, 15 September 2013

"धैर्य बिना जीवन कभी साकार नही होता"
"धैर्य हो जिस मन मेँ कभी बीमार नही होता"
"धैर्य रखने वालो की कभी हार नही होती"
"क्योकि धैर्य से बड़ा कोई भी हथियार नही होता"

 by unknown
येथे द्वेषांचा कहर,
हा संधी साधूंचा प्रहर,
फिरते पुढाऱ्यांची लहर,
घेती वादविवादांचा आधार,
मारती वक्तव्यांचे षटकार,
निष्कर्ष साऱ्याचा काय निघणार,
याची टोपी त्याच्या डोक्यावर,
सारा दीड शहाण्यांचा बाजार,
नीती,अहिंसा ना त्यांना मंजूर,
सत्तेच्या धंद्याशी सारे इमानदार,
कुरघोडी करण्यात ना कसर,
देश चालला खड्ड्यात,
इतकाच रोजचा समाचार

- कवी विद्यानुज
Photo
भाऊसाहेब पाटणकर
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.
बा. भ. बोरकर -- स्वर्ग नको सुरलोक नको

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा

शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा

शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा

इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा

आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा

तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा

मार्क्साचा मज अर्थ हवा अन फ्रॉइडचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा

लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षॊभ हवा

पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा

विश्व हवे सर्वस्व हवे अन मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा

हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्‍यांशीत प्रवास हवा
नामंजूर

जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजूर.
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची,
येइल त्या लाटेवर डुलणे नामंजूर.

मला ऋतूंची साथ नको, अन् कौल नको,
मला कोठल्या शुभ-शकुनांची झूल नको.
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा,
वेळ पाहुनी खेळ मांडणे नामंजूर.

माझ्या हाती विनाश माझा कारण मी,
मोहासाठी देह ठेवतो तारण मी.
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर,
मज आब्रुचे थिटे बहाणे नामंजूर.

रुसवे फुगवे भांडण तंटे लाख कळा,
आपला तुपला हिशोब आहे हा सगळा.
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी,
गगनाशी नेणे गार्हाणे नामंजूर.

मी मनास्वितेला शाप मानले नाही, अन् उपभोगला पाप मानिले नाही,
ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही.

नीती तत्वे फसवी गणिते दूर बरी,
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी.
जगण्या साठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वहाणे नामंजूर.

कवी – संदीप खरे
संगीत – सलील कुलकर्णी
---------------------------
नामंजूर - संदीप खरे
सम्हल सम्हल के नाँव चलाना नामंजूर
मुझे हवा की राह देखना नामंजूर
तय करता मैं दिशा भी बहते पानी की
मौज हिलाए जैसे, हिलना नामंजूर

नहीं चाहिये मौसम की सौगात मुझे
नहीं चाहिये शुभ शकुनों का साथ मुझे
मन करता हो वही महुरत है मेरा
मौका देख के खेल खेलना नामंजूर

अपने हाथों अपनी मौत मै मरता हूँ
मोह के लिये देह भी गिरवी रखता हूँ
खूबसूरती देख जिंदगी है कुरबान
अबरू का बेतुका बहाना नामंजूर

झगडा वगडा और मनाना है हरदम
तेरा मेरा हिसाब रखना है हरदम
जमा खर्च यहीं लेता हूँ देता हूँ
आसमान से चुगली करना नामंजूर

मनकी करने को शाप ना माना मैने
उपभोग को कभी पाप ना माना मैने
काले बादल जिससे गुजरे ना हो
आसमान वो कभी देखा ना मैने

गणीत नीती का मुझसे तो रक्खो दूर
रगों में बहता खून असली जीवन का नूर
खून बहाकर जीते रहना मुझे पता
अपने खून का गरूर करना नामंजूर

-----------------------------------

मूल कविता: नामंजूर
कवी: संदीप खरे
अल्बम: नामंजूर
हिन्दी भावानुवाद: तुषार जोशी, नागपूर
" सुखाचा राजमार्ग "
************************
ओढा सिगारेट , सोडा धूर
जीवन जाते , दूर दूर

ढोसून दारू होता धुंद
अनेक मार्ग होतात बंद

तंबाखू ज्याच्या , सदा मुखी
सांगा कसा तो , होणार सुखी ?

निरोगी शरीर , देतो देव
अब्जावधींची , तीच ठेव

आयुष्य देवून , तोही बघतो
माणसासारखे , कोण जगतो

जुगार पत्ता , कवडी खेळी
खिसा रिकामा , नेमक्या वेळी

मृगजळामागे , जो जो धावे
फजित होवून , जीभ चावे

समाधान ज्याच्या , वसते मनी
आनंदाचा तोच , होतो धनी

पैसा नि शांती , गोष्टी भिन्न
उगा कशाला , व्हावे खिन्न

यात्रिक व्हावे , आनंदाचे
घडे भरावे , स्वानंदाचे !!
**********************
मुरारी
********************

Sunday, 18 August 2013

तुतारी -- केशवसुत

एक तुतारी द्या मज आणुनी l
फुंकीन ती मी स्वप्राणाने l
भेदुनी टाकीन सगळी गगने l
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने l
आशि द्या मजलागुनी ll धॄ ll
अव्डंबरली ढगे किती तरी l
रवी किरणांचा चूर होतसे l
मोहोर सगळा गळून जातसे l
कीड पिकांवर सर्वत्र दिसे l
गाफील गिरी तरीही जगावरी ll १ ll
जुने जाऊ द्या मरणालागुनी l
जाळूनी किंवा पुरुनी टाका l
सडत न एक्या ठायी ठाका l
सावध ऐका पुढल्या हाका l
खांद्यास चला खांदा भिडूनी ll २ ll
प्राप्तकाळ हा विशाल मधुर l
सुंदर लेणी तयांत खोदा l
निजनामे त्यावरती नोंदा l
बसवूनी कां वाढवता मेदा l
विक्रम कांही करा चला तर ll ३ ll
संघशक्तीच्या भुईत खंदक l
रुंद पडणी शे तुकडे झाले l
स्वार्थानपैक्षी जीवी आपुले l
पाहिजेत ते सत्वर भरले l
घ्या उडया तर बेलाशक ll ४ ll
हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर l
शुरानो या त्वरा करा रे l
समतेचा ध्वज उंच धरा रे l
नीतीची ग्वाही पसरा रे l
तुतारीच्या या सुराबरोबर ll ५ ll
पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर l
तुंबळ संग्रामाला करिती l
संप्रति दानव फार माजती l
देवावर झेंडा मिरविती l
देवांच्या मदतीस चला तर ll ६ ll
केशवसुत
कविता आजच्या निष्क्रिय सुशिक्षित (विशेषतः मराठी) तरुणांना उद्देशून आहे.

 ज्ञानेश्वर ते कुसुमाग्रज वाचून मन कोरडेच राही,
प्रत्येक विषयाचे त्याला, ज्ञान काही ना काही,
धोका पत्करायला तो, वाट उदयाची पाही,
सारी गणिते कळून, कधी स्पर्धेत उतरलाच नाही
My favorite poem.
तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
...
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन...

- poet unknown
माझा ९ वर्षांचा भाचा श्रीश उत्कृष्ट कविता लिहितो त्याची ही एक झलक.

शेत

हिरव्या गार शेतात कोकिळा गातात,

रंगी बेरंगी झाडांवरती चिमण्या चिवचिव करतात,

निरभ्र आहे आकाश आणि सूर्य गोल,

हसत हसत वाऱ्या माझ्याशी बोल
----------------

उंदीर

इटुटले पिटुकले उंदीर मामा,

मनीमाऊ येताच करतात पोबारा,

मनीमाऊ आली रे पळा पळा,

बिळामध्ये लपून बसा,

हळूच बघतात बिळातून,

गेली का मनीमाऊ दुध पिऊन,

म्यावम्याव चूचू चाललय काय रे हे,

उंदीर आणी मांजर पकडा-पकडी खेळती रे,

इटुकले पिटुकले उंदीरमामा,

मनीमाऊ येताच करतात पोबारा
चेहरा असेल हसरा,
मनावर व्रण अजून आहेत,
दिवस असतील बदलले,
बऱ्या वाईट आठवणी अजून आहेत

- कवी विद्यानुज
धमाल विनोदी कविता

प्रेमात पडला ससा

कोणास ठाऊक कसा,पण प्रेमात पडला ससा,
काय त्याची अवस्था, कमळात भुंगा जसा ।।
रस्त्याने दिसली सशीन टंच, मारली गाडीवर उडी उंच,
मोडता पाय, प्लास्टर त्यावरी, ती न भेटायला आली घरी,
आता कळली, चूक खरी, नाही ही पदधत बरी ||
तिच्या बाजूला टाकला रुमाल, म्हणे तुमचा असेल तर घ्याल,
ती न ऐकता, वेगाने कमाल, पुढे गेली, निघून खुशाल,
न चालली यावेळीही, युक्ती चित्रपटातली ||
हट्टाला पेटला ससा, छाप पाडतो पहा कसा,
त्याने केला रिकामा खिसा, आणला उंची आरसा,
मारून अत्तराची शिशी, म्हणे मी भवरा, ती मोगरा जशी,
पुन्हा शिंकली माशी, ती दिसलीच नाही त्या दिवशी,
अशी झाली फजिती, ससा झोपला रात्री उपाशी ||
ठरवले आता सैन्यात जातो, अफाट शौर्य गाजवतो,
करून मेहनत सराव, केली नेमबाजीत सरशी,
भुईसपाट सारे शत्रू, गोळ्यांना पडले फशी
परत येता गावाच्या वेशी, किती वाढली होती कीर्ती ||
स्वागताला गाव गोळा, भरला सत्कारसोहळा,
सशीन आली घेवून हार, हा छाती फुगवून तयार,
मी नाही असामी साधी, आहेस का लग्नाला राजी,
विशाल माझे मन अन हृदय, व्हावा प्रेमाचा अरुणोदय ||
सशीन हसली खट्याळ, हा नाही ब्लैक अन्ड व्हाईट काळ,
झाले अफेअर चार, करशील का माझा स्वीकार,
बरी वाईट चर्चा पंचक्रोशीत, खरे काय ते मलाच माहित,
मी आले एकविशीच्या काठी, गाव लागला माझ्या पाठी ||
ससा पडला विचारात, ही महामाया पडली गळ्यात,
तर लागेल आयुष्याची वाट, एकल्याने सुखी राहावे जगात ||
घेवून निरोप, स्वतःला सावरत,निघाला पुढे, चालत झटपट,
आठवडे गेले विना कटकट, एक दिवस दारावर टकटक ||
नाही ओळखले तुम्ही कोण, ती म्हणे प्रेमात गेली वर्षे दोन,
वाट पाहिली कळण्याची, हद्द झाली तुझ्या बुद्धूपणाची ||
सुंदरीच्या रूपापुढे झाकोळली माझी काया,
तुला नाही जमले, रूपापेक्षा मन बघाया,
अशी जमली जोडी योग्य, सशाचे फळफळले भाग्य,
साधा जीवनात लक्ष्य सर्वोत्तम, चालून येईल जे जे उत्तम ||

- कवी विद्यानुज
मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं।
-------------------
हर चुनौती से दो हाथ मैंने किये,
आंधियों में जलाए हैं बुझते दिए।
आज झकझोरता तेज़ तूफ़ान है,
नाव भँवरों की बाँहों में मेहमान है।
--------------------
अटल जी की एक प्रेरणास्पद कविता-

मौत से ठन गई।
ठन गई!
मौत से ठन गई!
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई।
मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं।
मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?
तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर फिर मुझे आज़मा।
मौत से बेख़बर, ज़िन्दगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।
बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं।
प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाक़ी हैं कोई गिला।
हर चुनौती से दो हाथ मैंने किये,
आंधियों में जलाए हैं बुझते दिए।
आज झकझोरता तेज़ तूफ़ान है,
नाव भँवरों की बाँहों में मेहमानहै।
पार पाने का क़ायम मगर हौसला,
देख तेवर तूफ़ाँ का, तेवरी तन गई।
मौत से ठन गई।
- ताईगिरी

किती बदलो जग, आपले हळवे नाते,
राहो जवळ वा दूर, नाते अतूट राहते ।।धृ।।

इवलेसे पाय लटपटताना, बोट धरून चालवलेस,
नवीन शब्द वाचताना, स्पष्टपणे वदवलेस ।।

समजावल्याने ऐकतो कसला, धाकटा असतो हट्टी,
किती वेळा झाली कट्टी, पुन्हा आपली गट्टी ।।

बालपणीच्या छोट्या जगात, सर्वात जवळ,
क्षणाक्षणाला काळजी करणारी, तूच केवळ ।।

सुट्टीच्या दिवशी खायचो, वाटून बिस्कीट खारी,
पिठलं असो वा भाकरी, तू समाधान मानणारी ।।

आई नसताना घरी, सारे सांभाळणारी,
स्वच्छ घरओसरी, जेवण चविष्ट भारी ।।

लावून शुभं करोतीचा लळा, केलेस संस्कार,
होतो मातीचा गोळा, मिळाला आकार ।।

वेळोवेळी दिलेस बळ आणि प्रेमाची शिदोरी,
बेशिस्तीवर ओरडून, निभावलीस जबाबदारी ।।

जे घडलं ते चांगल्यासाठी, आशावाद जाणणारी,
मिळवून नेहमी यश, कमी मानणारी ।।

स्वतः शोधलेस रस्ते, बनून समजूतदार कष्टाळू,
बरे वाईट दिवस गेले, राहिलीस मायाळू ।।

कुणी पाठीशी नसून धडपड, परिस्थिती वळवण्याची,
मेहनत सतत करून जिद्द, करिअर घडवण्याची ।।

भांडून अनेकदा, नकळत दुखावलं असेल,
वाईट लक्षात ठेवणे, तुझ्या दुष्टीकोनात नसेल ।।

सगळ्या नात्यांना माणसांना, जपण्यात तुझे मोठेपण,
दिलेस घराला घरपण आणि भावाला शहाणपण ।।

धडपडताना सावरुन, भरकटताना आवरून,
आयुष्यात किती वेळा, घेतलेस मला सांभाळून ।।

तुझ्या पंखांच्या छायेत, वाढलो भाग्यवंत,
मार्गदर्शन अन मायेने, झालो यशवंत ।।

झालो कितीही मोठा, तरी तुझ्यासाठी लहान,
ना सोडशील ताईगिरी, ओढत राहशील कान ।।

- कवी विद्यानुज
त्यांना परकियांनी, आम्हा स्वकियांनी छळले,
सत्ता संपत्ती धर्मांच्या, कुरघोडीत गेलो पिळले,
त्यांना नसे भीती, ठावूक भारतीयाची खुण,
सहनशीलता त्याचा, सर्वात मोठा गुण

- कवी विद्यानुज
एकाखेरीज साऱ्यांचे, प्रयत्न अपुरे पडले असतील,
आयुष्यभरासाठी रचलेले, मनातले मनोरे कोसळले असतील,
गुलाब कोमजल्याने फार मने हिरमुसली नसतील,
पण तिच्या लग्नाने किती हृदये तुटली असतील

- कवी विद्यानुज
धन्य ते महापुरुष,कसे आदर्श वागले,
प्रतिकुलतेला त्यांनी, पुरुषार्थाने जिंकले,
व्रत हळहळ करण्याचे, आम्ही आजन्म पाळले,
शेजारी राजे जन्मण्याचे, स्वप्न रोज पाहिले

- कवी विद्यानुज
गुन्हेगारांच्या जगात, ना निष्पापांना स्थान,
धडपडणाऱ्या सामान्यांना, जगण्याचे आव्हान,
दुबळे राहणे पाप, गरिबी भयंकर शाप,
निष्क्रिय सज्जनांच्या तोंडी हळहळ, सात्विक संताप

- कवी विद्यानुज
बार आणि बालांची दलाली कायद्याने,
नैतिकतेचे नियम, वळती फायद्याने,
चंगळवादाचे, ललनांना आकर्षण,
करती हौशीने, सौंदर्य प्रदर्शन,
विना कष्ट, सोपी कमाई हवी,
बहकते नजर पुरुषांची,
ती इतर वेळ कशी बदलावी

- कवी विद्यानुज
लोकशाही राज्यात, सर्वांची एक बाजू,
आंधळ्या न्यायदेवतेचा, निःपक्षपाती तराजू,
कर्तव्यांना नाही, अधिकारांना होय,
बाजू मांडणे म्हणजे दोष ढकलण्याची सोय

- कवी विद्यानुज


सभ्य सुसंस्कृत, नेत्यांचे घोटाळे माफ,
लाख गुन्हे करून, त्यांचे चारित्र्य साफ,
माफिया अब्जाधीश, ऐषआरामात,
देश असो मंदी वा कर्जात, त्यांचे धंदे जोरात

- कवी विद्यानुज
रोज डोके भडकूनही, सहनशीलता बाकी,
प्रतिकूलतेतही घ्यायचीय, गरुडझेप मोठी ,
कुटुंबाच्या सुखाचे, नाही ध्येय छोटे,
कि देशहितार्थ त्याग करण्याला, नाही मन मोठे

- कवी विद्यानुज
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही.
मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.

भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना,
कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..

बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी.
सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो.
मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही.
मी डेटिंग केले नाही

अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे.
कॉलेजात अभ्यास केला, कंपनीत करतो कामे.
पण बोटातुन कुठलीही एंगेजमेंटची रिंग नाही.
कुणी प्रपोज केले नाही ,कधी फ़्लर्टिंग जमले नाही.

मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.

-- अभिजीत दाते
मूळ गीत - मी मोर्चा नेला नाही
कवी - संदीप खरे

(संदीप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांनी आणि एसींनी क्षमा करावी)
जिवलग वेदना देतात,
भावनांचे शब्द होतात,
शब्दांच्या कविता होतात,
कविता करता करता मीच एक कविता बनतो,
रसिकांच्या हृदयाला स्पर्शून जातो

- कवी विद्यानुज
आनंदी जीवन
वय वाढता वाढता संधी निसटतात,
दिवस काढता काढता ध्येये विसरतात,
भरकटत राहिलो गर्दीत आजवर,
म्हणून स्व:सामर्थ्याची जाणीव नाही झाली,
प्रेरणा बाहेर शोधताना धक्के मिळाले,
आदर्श शोधताना ढोंगी मिळाले,
स्वतःच स्वतःला आदर्श मानू लागलो,
मनाच्या आवाजाने वागू लागलो,
सरड्याहून अधिक रंग बदलू लागलो,
कसले ध्येय, कसल्या आशा,
जीवन आहे रम्य प्रवास,
धडपडताना घ्यायचा मोलाचा श्वास,
संस्कृतीचा अहंगंड, नैतिकच्या गप्पा व्यर्थ,
छोट्या छोट्या आनंदात जीवनाचा अर्थ,
आनंद वाटण्याची किमया काहींनाच जमते,
बाकीच्यांना जीवन अनंत वाळवंट वाटते

- कवी विद्यानुज
तत्वांचे राजकारण संपून, अब्जावधींचा खेळ होतो,
महापुरुषांचा वापर आणि खुर्च्यांचा मेळ होतो

- कवी विद्यानुज
प्रेमरंजन

 माझ्या रसिकतेला लंपटता समजते,
शुभ्र राजहंसाला कावळा समजते,
पद्यात व्यक्त होतात मनोहर कल्पना,
त्या ओघात घडतात अजरामर रचना,
स्तुती सुमनांनी तिचे मोल शतपटींनी वाढते,
बावरलेल्या वेडीला कौतुक काय समजते,
स्तुती नावडण्यात तिचा नाइलाज असतो, तिच्या रागात दूरदृष्टीचा भाग असतो,
खऱ्या-खोट्या असंख्य मजनूंची भेट होत असते,
धोके टाळण्यासाठी पुरुषांना एकसमान लेखते,
कसे जमते तिला - क्षणात आकर्षित करणे,
उत्साहात बोलणे नि संमोहित करणे,
छोट्याशा संवादांनी ती जिवलग मैत्रीण भासते,
असले निष्कर्ष काढल्यानेच तर वाट लागते,
आनंदी राहण्याच्या छंदात तृप्त असते,
मनात खळबळ माजवून अलिप्त असते,
तिच्या भल्याखातर वेडेपणाचा माग सोडावा,
तिच्या स्वार्थीपणाचा अविचारी राग सोडावा,
तिची नाही ही बनवणाऱ्या ईश्वराची किमया,
अप्रतिम व्यक्तिमत्वे घडवतो लिलया,
निष्कर्ष इतकाच प्रेमाच्या स्वप्न रंजनात गुंगू नये,
कमकुवत हृद्यवाल्यांनी तिला भेटू नये,
... तिला भेटू नये

- कवी विद्यानुज
धर्म आणि पराक्रम एकत्र जन्म घेतील का,
वर्तमान सुधारायला शिवराय पुन्हा येतील का,
प्राण राजावर ओवाळायला लाख मावळे तयार आहेत,
जिवाला जिव देणारा कुणी राजाच भेटत नाही

- कवी विद्यानुज
षंढ सारी लेकरे...

षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ कर..

षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर

वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला
वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर

टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे
ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर

कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर

दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर

घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
- प्राजु

http://www.misalpav.com/node/18509
बाळ
धावत राही, खेळत राही,
बाळ आमचा, थकत नाही
दिवसभर मस्ती, न थांबता करे,
तरी रात्री कशी, पोळी न सरे॥ध्रु॥

छोटा भीम पाहण्यात प्रचंड आनंद,
राक्षसांच्या भीतीने दरवाजे बंद,
टिव्ही पाहे, मन लावून,
पडती स्वप्ने, कार्टून पाहून॥

दोन दिवसात खेळणे जुने,
अनमोल त्याच्या कलेचे नमुने,
फावल्या वेळेत चित्रकलेची खोड,
जागा मिळेल तिथे रेषा ओढ॥

रागावल तर त्याची, रागाने आग,
माराल तर छेडतो शास्त्रीय राग,
शक्ती एकवटून रागाने पाही,
पुढल्या क्षणाला विसरून जाई ॥

कुस्ती खेळताना येई शक्ती अचाट,
प्रश्न विचारता, चालवी डोके भन्नाट
त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी फार,
गोष्ट ऐकताच, करे नवीन तयार ॥

बागेत गेल्यावर करे धमाल,
आनंद ओसंडून वाहे कमाल,
मोठ्यांना घोडा बनवून स्वार,
अति मस्ती करताच आईचा मार ॥

आजारी पडल्यावर शक्ती गुल,
सदाफुलीचे सुकलेले फुल,
साऱ्या घराचे त्याच्यावर लक्ष,
होतो दोन दिवसात तंदुरुस्त ॥

आजी आजोबा लावती शिस्त,
शुभम करोतीला जोडे हस्त,
मोठ्या माणसांवर बारीक नजर,
नक्कल करण्यात ना सोडे कसर ॥

घाबरवे मारून, वाघोबाची डरकाळी,
बिलगे आई बाबांना, ते येताच संध्याकाळी,
घरापासून शाळेत, तो सर्वाना हवा,
सर्व माणसाना, जोडणारा दुवा ॥

प्रत्येक गोष्टीत, शोधे गम्मत,
तुमची नजर हटताच करामत,
त्याच्यासाठी सगळे, होती लहान,
विसरून सारे, जीवनातले ताण ॥

जीवन आहे एकदाच, भातुकलीचा खेळ,
साजरा करायला,प्रत्येक क्षण योग्य वेळ,
तो जाणे केवळ,स्वतःचे तत्वज्ञान,
नसे ठावूक गडयाला, धर्म वा विज्ञान ॥

सगळ्यांना सतावून, राही गोजिरा,
प्रत्येक क्षण, सणासारखा साजरा,
हा दृष्टीकोन, आपल्यात येवो,
सारे दुःख-चिंता, पळून जावो ॥

मनात येईल ते, वाटेल तसे करे,
चूक कळताच, आईच्या कुशीत शिरे,
मानमरातब,स्वार्थ काही क्षण विसरा,
व्हाल सुखी, विना मिळता कुठला सदरा ॥

- कवी विद्यानुज
मैत्रीण
जरी ती हसण्या-बोलण्यात उदार,
तिच्या स्मितहास्याला स्वार्थाची किनार,
तिच्या दिसण्याने नाही घसरणार, जरी तुमचा तोल,
तिच्याकडे नाही माणसांना, गरज संपल्यावर मोल ,
तिला संधी देणे डोंगराएवढी चूक,
तिची लहर बदलण्याला सुई एवढे कारण खूप,
तिच्या प्रेमळ शब्दांची गरज आपलेच न्युन,
तिच्याशी कसेही वागले तरी शेवटी उरते शून्य,
तिला ठाऊक आहे दुनियादारी पक्की,
जेव्हा चेहऱ्यावर स्मित ,तेव्हा मनात खोड नक्की,
कराल थोडे काही, जेव्हा तिच्या आनंदासाठी,
तिच्या मनात तयार, पुढील मागण्यांची यादी,
जग आनंदाने वाहे,त्यांची आयुष्यभर ओझी
एवढया गोष्टी सोडल्या तर ती किती छान,
आयुष्याच्या डायरीतले एक सुंदर पान,
फणसाला ही असतात बाहेरून काटे,
हे तर तिचे दाखविण्याचे पहिले रूप होते,
आत भावनांचे बांध, किती अडवलेले,
स्नेह, माया, लाज सारे दडवलेले,
निराशा, उदासी तिच्या चेहऱ्यापासून पळते,
कारण सदैव आनंदी राहणेच तिला आवडते,
कठोर जगात जगायला धैर्य, आशा देते,
तुमच्या भरकटत्या जीवनाला योग्य दिशा देते,
व्यवहाराबरोबर भावना सांभाळण्याचे, तिच्याकडे कसब,
समजून घ्याल तिला, तर घडवाल नशीब,
असेल वेळ थोडा,तर अशी मैत्रीण जोडा,
साऱ्या अढी तुमच्या, मनातल्या सोडा,
सगळ्या नसतात वाईट, जरी वागतात तोऱ्यात,
तुमची नजर आणि योग, हवे थोडे जोरात,
शुभेच्छा तुम्हाला अशी मैत्रीण मिळायला,
धावपळीच्या आयुष्यात काही आनंदी क्षण साठवायला

- कवी विद्यानुज
मराठी पाऊल

मावळ्यांचा वाचते जग इतिहास,
साहित्यिक बनून घडवतो समाज,
संत बनून करी विश्वकल्याणा प्रार्थना,
क्रांतिकारक होऊन स्वातंत्र्य गर्जना,
व्यावसायिक होऊन करे दर्जेदार उत्पादन,
सुधारक बनून समाजपरिवर्तन,
वैज्ञानिक बनून सोडवी निसर्गाचे कोडे,
राजनीतीत देशात सर्वांना भारी पडे,
तंत्रज्ञ होऊन घडवी परम संगणक यंत्रणा,
कायदेतज्ञ होऊन लिहितो देशाची घटना,
उभारे कुष्टरोग्यांसाठी केंद्र,स्रियांसाठी शाळा,
करे न्यायासाठी आंदोलन, होई सारा देश गोळा,
सर्वोच्च न्यायालयात करे न्यायदान,
सर्वाधिक गाण्याबद्दल गिनीज बुकात स्थान,
खेळात महाशतकांचा विक्रम,
अंदमानातून परतण्याचा भीमपराक्रम,
नेमबाजीच्या खेळात, लक्ष्यभेद अचूक,
हजारो वीर झाले, पत्री सरकार ते भूदल प्रमुख,

आता प्रवास का चालला उलटा,
तरुणांचा उपयोग गुंडगिरी पुरता,
सत्ता संपत्तीला भुलून ठेवतो इमान-बुद्धी गहाण,
क्षणिक फायद्यासाठी हरवतो आत्मसन्मान,
मेकॉलेच्या शिक्षणाने कारकुनीपुरता घडला,
नोकरीला नशिब मानल्याने विकास अडला,
धनिक परप्रांतीय पाहून न्युनगंडांनी घेरला,
जातीयवादाच्या दुष्टचक्रात अलगद फसला,
अशा पक्ष संघटनांचे, जाळे मोठे फार,
तुमची असुरक्षितेची भावना, हेच त्यांचे बळ,
झाल्या चुका सगळ्यांकडून, किती काळ त्रागा,
जातीयतेचा चष्मा काढून मोकळ्या मनाने वागा,

अल्पसंतुष्ट मनात सगळ्या इच्छा विरून जातात,
नाकर्तेपणा लपवायला कारणे हजार भेटतात,
स्वाभिमान जागा होण्याची आता वेळ आली,
कात टाकून परंपरा आठवण्याची गरज निर्माण झाली,
आदर्शांनी बनवलेत मार्ग किती महान,
त्यांना सांभाळण्याचे स्वीकार आव्हान,
काळ बदलला तरी तत्वे तीच राहू दे,
जगाला तुझ्या तालावर चालू दे,
काळ बदलल्याने परंपरा संपतील का,
अंतर्मनावरच्या निष्ठा पुसतील का,
जपण्यासाठी स्वत्व, राहा खंबीर,
असो सज्जनतेवर विश्वास आणि अन्यायाची चीड,
भूतकाळातील कर्तृत्व होते विशाल,
बनव पुन्हा प्रखर, इच्छाशक्तीची मशाल,
आज पुन्हा आई भवानी आणि रायरेश्वराला साकडे,
स्वराज्याच्या स्थापनेसाठी, मराठी पाऊल पडो पुढे,
…… मराठी पाऊल पडो पुढे,

- कवी विद्यानुज
नसो सत्ता संपत्ती, झगडण्याची शपथ,
मनगट आणि बुद्धीत, बाळगतो धमक,
नशीब दुर्दैवाच्या, कल्पना मागे सोडल्या,
अंधश्रद्धा चाली रूढी, धाडसाने मोडल्या,
स्वातंत्र्य दिशा भविष्य, सारे अमुच्या हाती,
जग जिंकण्यासाठी, दुनिया झुकवण्यासाठी

- कवी विद्यानुज
भविष्य बिकट आहे,
रस्ता अटळ आहे,
टक्कर देवून तर पाहू,
हे वादळ आहे कि वावटळ आहे

कवी विद्यानुज