Sunday, 18 August 2013

मैत्रीण
जरी ती हसण्या-बोलण्यात उदार,
तिच्या स्मितहास्याला स्वार्थाची किनार,
तिच्या दिसण्याने नाही घसरणार, जरी तुमचा तोल,
तिच्याकडे नाही माणसांना, गरज संपल्यावर मोल ,
तिला संधी देणे डोंगराएवढी चूक,
तिची लहर बदलण्याला सुई एवढे कारण खूप,
तिच्या प्रेमळ शब्दांची गरज आपलेच न्युन,
तिच्याशी कसेही वागले तरी शेवटी उरते शून्य,
तिला ठाऊक आहे दुनियादारी पक्की,
जेव्हा चेहऱ्यावर स्मित ,तेव्हा मनात खोड नक्की,
कराल थोडे काही, जेव्हा तिच्या आनंदासाठी,
तिच्या मनात तयार, पुढील मागण्यांची यादी,
जग आनंदाने वाहे,त्यांची आयुष्यभर ओझी
एवढया गोष्टी सोडल्या तर ती किती छान,
आयुष्याच्या डायरीतले एक सुंदर पान,
फणसाला ही असतात बाहेरून काटे,
हे तर तिचे दाखविण्याचे पहिले रूप होते,
आत भावनांचे बांध, किती अडवलेले,
स्नेह, माया, लाज सारे दडवलेले,
निराशा, उदासी तिच्या चेहऱ्यापासून पळते,
कारण सदैव आनंदी राहणेच तिला आवडते,
कठोर जगात जगायला धैर्य, आशा देते,
तुमच्या भरकटत्या जीवनाला योग्य दिशा देते,
व्यवहाराबरोबर भावना सांभाळण्याचे, तिच्याकडे कसब,
समजून घ्याल तिला, तर घडवाल नशीब,
असेल वेळ थोडा,तर अशी मैत्रीण जोडा,
साऱ्या अढी तुमच्या, मनातल्या सोडा,
सगळ्या नसतात वाईट, जरी वागतात तोऱ्यात,
तुमची नजर आणि योग, हवे थोडे जोरात,
शुभेच्छा तुम्हाला अशी मैत्रीण मिळायला,
धावपळीच्या आयुष्यात काही आनंदी क्षण साठवायला

- कवी विद्यानुज

No comments:

Post a Comment