बाळ-२
ऐटीत चाले, ऐटीत बोले,
जणू कार्यालयात, साहेब
निघाले ||धृ||
बोलणे त्याचे, फार गोड,
युक्तिवाद, सारे बिनतोड ||
क्षणोक्षणी दादाशी स्पर्धा,
प्रत्येक गोष्टीत, हवा भाग
अर्धा||
ओरडताच, रुसवा धरे,
चूक तुमची, त्याचे खरे ||
दुधवाल्या काकांना दरडावे,
सारे हिशोब, त्याला ठावे ||
गणपती बाप्पांना, करे
प्रार्थना,
दर वर्षी, लवकर याना ||
कार्टून चित्रपटांचे, अति
वेड,
त्यात जादूचे, हवे खेळ ||
कधी बेततो, धाडसीपणा,
पडे असा, कि लवकर उठवेना ||
जीव लावण्यात, ना सोडे तुट,
बनवे प्रत्येकाशी, नाते
अतूट ||
ताटात अन्न, हवे सुटसुटीत,
मन भरून खावून, बने
गुटगुटीत ||
व्यस्त दिनक्रमात, न मिळे
सवड,
त्यातून भागवे, गप्पांची आवड
||
मित्र मंडळींची, संख्या मोठी,
वाटती सुख-दुखेः, छोटी मोठी
||
मोठ्या माणसांना, मारे
मस्का,
चूक करताच, वा काही हवे
असता ||
रूप त्याचे, राजबिंडे
देखणे,
त्यात कपडे, फॅशनचे नमुने ||
गोकुळातील हा, कृष्णा
खोडकर,
भेटेल त्याला, आपलेसे कर ||
No comments:
Post a Comment