त्यांना परकियांनी, आम्हा स्वकियांनी छळले,
Kavi Vidyanuj
सत्ता संपत्ती धर्मांच्या, कुरघोडीत गेलो पिळले,
त्यांना नसे भीती, ठावूक भारतीयाची खुण,
सहनशीलता त्याचा, सर्वात मोठा गुण
------------------------------ --------
एकाखेरीज साऱ्यांचे, प्रयत्न अपुरे पडले असतील,
आयुष्यभरासाठी रचलेले, मनातले मनोरे कोसळले असतील,
गुलाब कोमजल्याने फार मने हिरमुसली नसतील,
पण तिच्या लग्नाने किती हृदये तुटली असतील
------------------------------ --------
------------------------------
दुधात पाणी, तांदुळात खडे,
तुपात डालडा, चहात पावडर,
तुपात डालडा, चहात पावडर,
नात्यागोत्यात,मैत्री, प्रेमातही भेसळ,
कोण कशासाठी जवळ, ओळखणे अशक्य केवळKavi Vidyanuj
No comments:
Post a Comment