आमची इग्नू
आमची इग्नू किती झकास,
सगळ्या विद्यापीठात खास,शिका इथे, साऱ्यांनी बिनधास्त,
विद्यार्थांवर खूप विश्वास ||धृ॥
यांच्या आंतरराष्ट्रीय शाखा,
आमची इग्नू किती झकास,
सगळ्या विद्यापीठात खास,शिका इथे, साऱ्यांनी बिनधास्त,
विद्यार्थांवर खूप विश्वास ||धृ॥
आमचे विद्यार्थी,करती कष्ट,
आठवडाभर नोकरी, अभ्यासात व्यस्त,
अभ्यासक्रम कठीण, इच्छाशक्ती जबरदस्त
आठवडाभर नोकरी, अभ्यासात व्यस्त,
अभ्यासक्रम कठीण, इच्छाशक्ती जबरदस्त
चिकाटीने देती परीक्षा, वर्षानुवर्ष ||
वेबसाईट शोधा एक, सापडती हजार,
शोधाल ते सारे, तिथे तयार,
माहितीच्या महाजंजाळात काय पाहाल,
वाचता वाचता वैतागाल ||
एकीकडे कार्यालय,दुसऱ्या भागात विद्यालय,
परीक्षा असे, शहराच्या कोपऱ्यात,
शुल्काच्या बाबतीत, सर्वात स्वस्त,
तरीसुद्धा सगळी, व्यवस्था मस्त ॥
शुल्काच्या बाबतीत, सर्वात स्वस्त,
तरीसुद्धा सगळी, व्यवस्था मस्त ॥
कधी कधी, होतात घोळ,
पुस्तके येण्याची, निघून जाते वेळ,
कुणाला विचारावा, अशा वेळी जाब,
भागवावे लागते, सॉफ्टकॉपीवर काम ॥
किती उशीर, का लवकर गेलात,
अभ्यास केला, वा नाही केलात,
अभ्यास केला, वा नाही केलात,
तुमचा गणवेश कुठे गेला,
ना विचारती कारण कुणास||
ना विचारती कारण कुणास||
अभ्यासाच्या नावाने, आमची बोंब,
इथे ना चाले, नुसते सोंग,
सुरुवातीपासून अभ्यासाचा, करा घाट,
इथे ना चाले, नुसते सोंग,
सुरुवातीपासून अभ्यासाचा, करा घाट,
नाहीतर परीक्षेत, लागते वाट ||
इथले शिक्षक, किती अनुभवी,
उदाहरणासह विषय शिकवी,
काहीही प्रश्न, तुम्ही करणार,
त्याचे उत्तर, नक्की मिळणार ||
यांच्या वेगाला, नाही तोड,
थिअरीला देती, प्रक्टिकलची जोड,
वेगाने सर्व, अभ्यासक्रम पूर्ण,
जणू सुपरमैनचे, बाप अवतीर्ण ॥
विश्वस्तरावर मिळवली मान्यता,
जे न मानती, ते एक मूर्ख ,
ज्ञानाला माना, त्याविना गुणपत्रके व्यर्थ ॥
विना पाहता अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका,
मत बनवणे, योग्य आहे का,
तुरुंगात सुद्धा इग्नू पोहोचते,
माणसांना स्पर्धेसाठी सक्षम बनवते ॥
इथे सर्वांना, समान संधी हे खास,
हवी मेहनतीची तयारी आणि अट्टाहास,
ठरावा लक्ष्य, घ्या इग्नूत प्रवेश,
मिळेल जीवनात यश, हा हितोपदेश ॥
No comments:
Post a Comment